कोल्हे यांच्या पैशांवर जमिनी घेऊन संपत्ती कमवणाऱ्यांनी माझ्यावर टीका करू नये !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-पराग संधान तुम्ही कोल्हेंच्या पैशांची देखरेख करायची आणि त्याच पैशावर हायवेच्या कडेला कमी भावात जमीन खरेदी करून त्याच जमिनी शासनाला चारपट भावात विकनार आहे.

एवढाच उद्योग तुम्ही प्रामाणिकपणे करता. तुम्ही फक्त तोच करा. जनतेने तुम्हाला नाकारलेले आहे. विकासाच्या गप्पा तुमच्या तोंडून शोभत नाही, अशी बोचरी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पालिकेच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. वहाडणे म्हणाले, संधान तुम्ही व कोल्हेंनी शेतकऱ्यांची यशवंत पोल्ट्री खाल्ली,

नगर पालिकेच्या येसगाव येथील साठवण तलावातील पाणी चोरी केली. भ्रष्टाचार करून समृद्धी महामार्गाला जमिनी विकून आमाप पैसे कमावले. तर उपनगराध्यक्ष यांना मी सांगू इच्छितो की, चार वर्षांच्या काळात १८ कोटींपैकी ११ कोटींची कामे ही भाजप नगरसेवकांच्या वार्डात केली.

आणि यात ९० टक्के काम करणारे ठेकेदार हे कोल्हे गटाचे आहे. केवळ वहाडणेंना २८ कामांचे श्रेय मिळू नये म्हणून तुमच्यासह कोल्हेंचे भाट असलेले भाजपचे नगरसेवक नेत्यातला खुश करण्यासाठी शहराच्या विकास कामाला विरोध केला. कोणत्याही चौकशीला मी समर्थ आहे. तुमचे अनेक नगरसेवक खासगीत सांगता की तुम्ही आमचे सर्व कामे केली.

मात्र, आम्हाला कोल्हेंचा आदेश ऐकावा लागतो. कोल्हेंचे पीए आमच्यावर वॉच ठेवतात.म्हणून आम्हाला तुमच्यावर सर्वसाधारण सभेत खोटेनाटे आरोप करावे लागतात. एवढी लाचारी स्वीकारणाऱ्यांनी माझ्या विषयी बोलताना आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारावा. या अगोदरही एमजीपी मार्फत कामे झाली, तेव्हा ते चालले.

मग आत्ताच एमजीपी नको, हा अट्टाहास कशाला. रस्त्यांच्या काममध्ये जेवढे काम झाले, तेवढेच पैसे ठेकेदाराला या अगोदरही दिले. ज्या ठिकाणी ब्लॉकची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी बसवणार आहे.मात्र, यांनी खोटी पत्रके वाटून रस्त्यांच्या कामाविषयी चुकीची माहिती जनतेत पसरवली.

८४ लाखांच्या गटारी काम तुमच्या जवळच्या नगरसेवकांच्या ठेकेदाराला मिळणार होते म्हणून तुम्ही त्या ८४ लाखांच्या गटारीचा उल्लेख केला नाही. मात्र, ज्यावेळी हे टेंडर आपल्याला मिळत नसल्याचे पाहून त्यांचा आपण मोठा आगडोंब केला. यावरून तुमची भूमिका किती दुटप्पी आहे, हे सर्वांना कळले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव शहरातील सातभाई व कैलास जाधव हे अजून विसरले नाही. आणि ते माझ्यावर आरोप करत म्हणत आहे की शहरात ४७० खोका शॉप होतील. मात्र, सातभाई स्वतः नगराध्यक्ष असताना झोपले होते का? त्यावेळ स्नेहलता कोल्हे आमदार होत्या.

नगराध्यक्ष तुमचा होता. तत्कालीन महिला मुख्याधिकारी तुमच्या, राज्य व देशात सत्ता तुमची होती. मग तेव्हा विस्थापितांचा कळवळा आपल्याला का आला नाही. तरी देखील आता मी लवकरच विस्थापित यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे तो प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे.

फक्त विकास कामांचे उद््घाटन करायची घाई कोल्हे यांना झाली होती. जरा सिन्नर व संगमनेरचे बसस्थानकात किती गाळे निघाले. तेथील लोकांचा प्रश्न मिटला. मात्र तुम्ही कोपरगावच्या बसस्थानकात मुद्दाम राजकारण करून गाळे बांधले नाही.

आणि आता विस्थापितांचा खोटा कळवळा दाखवत आहात. तुमच्याच लोकांनी अतिक्रमणे करून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या सामान्य नागरिकांकडून हप्ते वसुली करत आहे. तुमचेच भाजपचे नगरसेवक मला सांगतात की पहिल्यांदा स्वीकृत नगरसेवक कैलास जाधव यांचे अतिक्रमणे काढा. तुमच्याच गटबाजीमुळे शहर विकासाला खीळ बसली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24