शिवसेना खासदार संजय राऊतांना धमकी…मदत करा, अन्यथा तुम्हालाही….

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- राजकारणात दरदिवशी काहिनाकाहीतरी घटना घडत असतात. यातच एक खळबळजनक माहिती समोर आलो आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे. विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी काही खळबळजनक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर आरोप होत असून प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईवरुनही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

संजय राऊत यांनी पत्रात म्हंटले कि, “एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझी भेट घेत राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत मागितली होती. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यासाठी मदत करावी असा त्यांचा हेतू होता.

दरम्यान याबाबत मी नकार दिला आता मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी देण्यात आली. जेलमध्ये राहावं लागलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांप्रमाणे मलाही परिणाम भोगावे लागलील असं सांगण्यात आलं.

इतकंच नाही तर माझ्यासोबत कॅबिनेटमधील इतर दोन वरिष्ठ मंत्री आणि याशिवाय इतर दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी देण्यात आली आहे.