वीज बिल वसुली करणाऱ्या वायरमनला जीवे मारण्याची धमकी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनला चक्क शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे घडली आहे.

या प्रकरणी वायरमन सीताराम भीमराव खंडागळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शरद संजय आहेर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील येसगाव सबस्टेशन खिर्डी गणेश येथील वायरमन सीताराम भीमराव खंडागळे हे परिसरातील नवले वस्ती येथे दैनंदिन वसुली करिता गेले होते. या दरम्यान शरद संजय आहेर यास मार्च महिन्या पासुनचे थकीत बिल भरण्यास सांगितले.

त्याचा राग आल्याने मी बिल भरणार नाही, तु परत आल्यास तुला मारुन टाकीन अशी धमकी देऊन हातात विट उचलून मारण्याची धमकी दिली तसेच शिवीगाळ केली व फोन करुन म्हणाला की तु येथे येणार की नाही, नाही तर तुझे फार वाईट होईल.

याबाबत वायरम खंडागळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शरद संजय आहेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24