अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- २० ऑगस्ट २०१७ रोजी विवाहितेने आत्महत्या केली होती. पोलीस तपासात सुनीता यांच्या कमरेला एक चिठ्ठी मिळून आली होती.
या चिठ्ठीच्या आधारे तब्बल साडेतीन वर्षांनी त्याचे अवलोकन करून तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पतीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
सुनीता अमित पालवे (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनीता यांनी २० ऑगस्ट २०१७ रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती.
सुनीता यांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या आई-वडील किंवा इतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. यावेळी पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती.
दरम्यान, पोलीस तपासात सुनीता यांच्या कमरेला एक चिठ्ठी मिळून आली होती. या चिठ्ठीच्या आधारे तब्बल साडेतीन वर्षांनी त्याचे अवलोकन करून पोलिसांनी शुक्रवारी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
या चिठ्ठीत तिने पती, सासू-सासरे व दीर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन पोलिसांनी याचा तपास केला नसल्याने यापूर्वी गुन्हा दाखल झाला नाही.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती. चिठ्ठीवरून आता तपास करून सुनीता पालवे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पती अमित पोपट पालवे, सासरा पोपट पालवे,
सासू छाया पोपट पालवे, दीर अजित पोपट पालवे आणि अरविंद पोपट पालवे (सर्व रा. पद्मानगर, पाइपलाइन रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.