अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ वॉशिंग्टन : कॉल सेंटरच्या माध्यमातून शेकडो अमेरिकन नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या तीन भारतीय अमेरिकनसह ८ जणांना येथील न्यायालयाकडून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मोहम्मद काझिम मोमीन (३३), मोहम्मद शोजब मोमीन (२३) आणि पालक कुमार पटेल (३०) अशी शिक्षा झालेल्या भारतीयांची नावे आहेत.
भारतामध्ये स्थित असलेल्या एका कॉल सेंटरच्या माध्यमातून या तिघांसह ८ जणांनी अमेरिकन नागरिकांची तब्बल ३.७ मिलियन डॉलर अर्थात २६ कोटी रुपयांची फसवणूक केली.