स्टीव्ह जॉब्स यांचे तीन नवनिर्माण ज्यांनी बदलले जग !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- 56 वर्षांच्या आयुष्यात जगाचा निरोप घेणा-या स्टीव्ह जॉब्स या अवलियाच्या कलंदर आयुष्यातील प्रत्येक वळण हाच एक संदेश ठरले. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला.

तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकाºयांना निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला अ‍ॅपल-1 हा पीसी लाँच केला.

अ‍ॅपलच्या सहकाºयांसोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. 1997 मध्ये तोट्यात चालत असलेल्या अ‍ॅपलच्या सल्लागारपदावर ते परतले. 2000 मध्ये अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन अणि आयपॅड सादर केला.

त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला आहे. संगीताचे जग : आयपॉडने 2001 साली अ‍ॅपलने 5 गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. अ‍ॅपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.

फोनचे जग : आयफोनने 2007 वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईलवेड्यांना आणखीच वेड लावले.

टॅब्लेटचे जग : आयपॅडने 2010 साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस,

वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-2 मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.