अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- सरपण आणण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा तिघाजणांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे घडला आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे पीडित विवाहिता सरपण आणण्यासाठी गेली असता
राजेंद्र जिजाबा फटांगरे, संकेत संजय फटांगरे व किरण संजय फटांगरे या तिघांनी संगनमताने महिलेशी झटापट करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच बचावासाठी आरडाओरड केली असता पती, सासू व सासरे आले असता त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
यामध्ये पीडितेचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आदिनाथ गांधले हे करत आहे