अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांव येथील घोड कॅनलवर स्वीफ्ट कार, रिक्षा आणि दुचाकी या तीन वाहनांचा विचित्र अपघात होउन दोनजण गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्यानंतर अपघातातील दुचाकी जागेवरच सोडून दुचाकीस्वार फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या बाबत सविस्तर असे की, शनिवार दि.३ वाजण्याच्या सुमारास मढेवडगांव येथील घोड कॅनलवर एक दुचाकीस्वार अवैध मार्गाने हातभट्टी दारू विक्रीसाठी दारूचा ड्रम घेऊन भरधाव वेगाने घोड कॅनलच्या कच्या रस्त्याने हायवेवर येत असतानाच
नगरकडून दौंडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार (क्र.एम.एच ०३ इ.यु.४९९५) हिने दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या रिक्षा (क्र.एम एच १६ बी सी १८९८) हिला जोराची धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली. या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे परिसरात पसरले.
अपघातातील जखमींना मढेवडगाव येथील युवकांनी तातडीने नजीकच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.