अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- पुरवठा विभागाने नुकतेच केडगावमध्ये बयोडिझेलची विक्री प्रकरणी एक कारवाई केली आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली असून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर-पुणे रोडवरील कांदा मार्केटच्या बाजूला हॉटेलशेजारी गाळ्यामध्ये अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे प्राप्त झाली होती.
त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी बाळासाहेब शिंदे हा त्याच्याकडील बायोडिझेलची विक्री नवनाथ जपकर याला करीत असताना मिळून आला.
सदरचे बायोडिझेल जपकर हा त्याच्याकडील व्हॅनमध्ये भरत होता. सदर बायोडिझेल विक्री केंद्र नेप्ती शिवारात अशोक कराळे याच्या मालकीच्या जागेत असल्याचे समोर आले.
पथकाला याठिकाणी चार हजार 500 लीटर बयोडिझेल मिळून आले. याप्रकरणी बाळासाहेब गोरख शिंदे (रा. सुडकेमळा, बालिकाश्रमरोड, नगर), बयोडिझेलची विक्री होत असलेल्या
जागेचा मालक अशोक कराळे (रा. नेप्ती), अवैधरित्या बायोडिझेलची खरेदीकरून ते वाहनामध्ये भरणारा नवनाथ जपकर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.