अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे जिल्हा पोलीस दलात परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांची नागपूर परिक्षेत्रामध्ये तर शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते
व राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांची गडचिरोली परिक्षेत्र मध्ये बदली करण्यात आली आहे.
त्यांना अहमदनगर जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात आल्याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे.