अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- नगर कर्जत मार्गावरील थेरगावच्या शिवारात अचानक एका कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी कारमधील दोघंानी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र याआगीत कार पूर्ण जळून खाक झाली आहे.
सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीस इजा झाली नाही. याबाबत सविस्तर असे की, शिक्षक किरण जगन्नाथ शिंदे व त्यांचे चुलते अशोक पाराजी शिंदे (रा.थेरगाव) हे दोघेजन घुगल वडगाव (ता.श्रीगोंदा)येथून शेतातील काम आटोपून परत गावी थेरगाव तालुका कर्जत येथे येत असताना
रविवार दि.२१ रोजी दुपारी २ च्या सुमारास कर्जत अहमदनगर या मार्गावर आनंदवाडी जवळ अचानक टाटा कंपनीची व्हिस्टा (एम एच १४ सिएक्स ८६५४) या गाडीच्या बोनेट मधून अचानक धूर निघू लागला असल्याचे दिसले व काही तरी जळाले सारखा वास आला म्हणून गाडी रोडच्या साईडला घेतली व गाडीचे खाली उतरले.
त्याच वेळी गाडीने अचानक पेट घेतला, त्यावेळी दोघांनी सदरची आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही व या आगीत गाडी पूर्ण जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आवश्यक मदत केली.