Indian Railways Ticket Concession : तिकीटाचे टेन्शन संपले! ‘या’ प्रवाशांना रेल्वे देतेय सवलत, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railways Ticket Concession : दररोज कितीतरी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच भारतीय रेल्वे सतत आपल्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती उपलब्ध करून देत असते.

परंतु, अनेकांना त्या सवलतींचा कसा लाभ घ्यायचा ते माहीत नसते. त्यामुळे ते मिळणाऱ्या सवलतींपासून वंचित राहतात. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचे नियम माहिती असणे गरजेचे आहे.

भारतीय रेल्वे पुरस्कार विजेते, महिला, डॉक्टर, बेरोजगार युवक, एस्कॉर्ट्स, पर्यटक मार्गदर्शक, विद्यार्थी, सैन्य कर्मचारी, अपंग,रुग्ण इत्यादींसह विविध श्रेणीतील प्रवाशांना प्रवास सवलत देते.

हे आहेत नियम

हे लक्षात घ्या की ही सवलत फक्त स्टेशन तिकीट आरक्षण काउंटरवरून बुक केलेल्या तिकिटांवर लागू असणार आहे. तसेच अपंग व्यक्तीला सवलत आणि रेल्वे पासच्या सवलतीचा ऑनलाइन फायदा घेऊ शकता.

  • प्रवाशांना फक्त एका वेळी एकाच प्रकारची सवलत मिळेल.
  • ही सवलत 300 किमी अंतरासाठी लागू आहे.
  • वेगळे भाडे देऊनही प्रवाशांना सवलतीचे तिकीट उच्च श्रेणीत अपग्रेड करता येणार नाही.

सवलतीचे प्रकार

या अगोदर रेल्वे तिकिटांमध्ये प्रवाशांना 53 प्रकारच्या सवलती मिळत होत्या. मात्र कोविड 19 मुळे रेल्वेमधील ज्येष्ठ नागरिक सवलतीसह एकूण 38 रेल्वे सवलती रद्द केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थची सुविधा मिळत आहे.सध्या विद्यार्थ्यांसह 15 प्रकारच्या IRCTC रेल्वे सवलती देतअसून त्यांचे 3-श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.

या लोकांना सवलत दिली जात आहे

  • रुग्णांना ही सवलत मिळते. रेल्वे 11 प्रकारच्या रूग्णांसाठी 50% ते 100% सवलत देत असून यामध्ये कर्करोग रूग्ण, हृदय रूग्ण, गैर-संसर्गजन्य कुष्ठरोग रूग्ण, किडनी रूग्ण, थॅलेसेमिया प्रमुख रोग रूग्ण, हिमोफिलिया रूग्ण, एड्स रूग्णांचा समावेश आहे.
  • दिव्यांग व्यक्तींसाठीही सवलत दिली जाते. या श्रेणी अंतर्गत, रेल्वे 4 प्रकारच्या अपंगांसाठी 25%-75% सवलत देते ज्यामध्ये दृष्टिहीन व्यक्ती, अस्थिव्यंग/अशक्त व्यक्ती, मतिमंद व्यक्ती आणि स्लीपर आणि एसी वर्गातील मूकबधिर व्यक्ती यांचा समावेश आहे.
  • भारतीय रेल्वे ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुली आणि 12वी पर्यंतच्या होम टाउन आणि शैक्षणिक दौऱ्यावर जात असणाऱ्या मुलांना सवलत देते. वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी प्रवेश परीक्षांना बसणाऱ्या मुलींसाठी सवलतीची तिकिटे मिळतात. या सवलतींअंतर्गत, विद्यार्थ्यांना आता मासिक सीझन तिकीट (MST) आणि त्रैमासिक सीझन तिकीट (QST) स्लीपर आणि सेकंड सिटिंग क्लासमध्ये मिळू शकतात.त्याचबरोबर ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुली आणि 12 वीपर्यंतच्या मुलांना मोफत द्वितीय श्रेणी MST मिळते. शाळा किंवा विद्यापीठांनी आयोजित केलेल्या किंवा मान्यताप्राप्त कोणत्याही स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थीही या सवलतीसाठी पात्र असतात.

अशा मिळवा सवलती

  • जर तुम्हाला सवलत मिळवायची असेल तर तुम्ही स्टेशन आरक्षण केंद्रातून सवलत घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे थेट स्टेशनच्या तिकीट बुकिंग कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.
  • नाहीतर तुम्हाला रेल्वे झोन, विभाग किंवा विभागीय रेल्वे मुख्यालयाच्या नियुक्त व्यावसायिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल, त्यानंतर तुम्हाला सवलत दिली जाईल.