अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- टायगर ग्रुप अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि आज ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 2 हजार वृक्षांचे वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
टायगर ग्रुप चे जिल्हा अध्यक्ष बंटी भिंगारदिवे म्हणाली की समाजात पर्यावरण संबंधी जागृती होत असताना पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे कोरोणाच्या संकट काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांना पटले आहे
वाढते शहरीकरण व रस्ता रुंदीकरणामुळे अनेक झाडे नाहीशी झाली झाडांची ही उणीव भरून काढण्यासाठी टायगर ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले तसेच कोरोणाच्या संकट काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने झाडांचे महत्त्व पटले असल्याची भावना व्यक्त केली
टायगर ग्रुप अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व सभासदांच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी टायगर ग्रुप अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बंटी भिंगारदिवे, उपनगर अध्यक्ष मनोज भोसले, केडगाव अध्यक्ष सोमा भोजने,
आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष पवन भिंगारदिवे, तुषार शिंदे, प्रतीक लिगडे, कृष्णा दांगडे, योगेश अंधारे, युवराज पचारणे, प्रफुल्ल ठोंबरे, सूर्या जाधव, सोनू भिंगारदिवे, संदीप जगताप, नादिर शेख, मिहीर ढसाळ, अवि मेढे, अरविंद कांबळे, दादा जंगम आदी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.