PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेतंर्गत अनेक शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता दाट आहे.
परंतु, आता या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागेल. त्यामुळे लवकरात वेळ हे काम करून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही.
खरं तर, तुम्हाला या कामांबद्दल माहिती असेल. परंतु, त्याआधी 13 वा हप्ता कधी येईल हे जाणून घेऊ. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात.
त्याआधी करा हे काम
नंबर 1
तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर जमिनीची पडताळणी काळजीपूर्वक करून घ्या. नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात.
नंबर 2
तसेच तुम्हाला ई-केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही अजून हे काम केले नसेल, तर लगेच करा. तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. सरकारने आधीच तसे स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आता अधिकृत पीएम किसान पोर्टल http://pmkisan.gov.in
वर जाऊन OTP आधारित ई-केवायसी करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हे काम करू शकता.