शिक्षकांना मार्चच्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ -बाबासाहेब बोडखे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- शिक्षकांच्या मार्चच्या वेतन देयकाबाबत शिक्षण संचालक यांनी 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन पाठविले आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांना मार्चच्या वेतनापासून वंचित रहावे लागणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. मार्च 2021 पेड इन एप्रिल 2021 ची देयके ही डीसीपीएसच्या कपाती ऐवजी एनपीएसच्या कपाती करून बिले स्वीकारण्याबाबत निर्देशित केले आहे.

या आदेशानुसार राज्यातील सर्व अधिक्षक, वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक यांनी ऑनलाइन पद्धतीने सादर केलेली माहे. मार्च 2021 ची वेतन देयके मुख्याध्यापकांच्या लॉगिनला परत केली आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मार्च पेड इन एप्रिल 2021 च्या वेतनाबाबत संकट निर्माण झाले आहे. हा विषय फक्त डीसीपीएस धारक शिक्षक, कर्मचारी यांच्या संदर्भात असून, डीसीपीएस एनपीएसमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचा आहे.

ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीसीपीएस धारकांच्या वेतनातून कपात न करता वेतन देयक सादर करण्याचे निर्देश देणे अत्यावश्यक आहे. यामुळे 10 मार्च 2021 ला निर्गमित केलेल्या आदेशात अंशतः सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.

अन्यथा संपूर्ण राज्यातील शिक्षक, कर्मचार्‍यांना मार्च 2021 च्या वेतनापासून वंचित राहावे लागणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मार्च 2021 च्या वेतन देयकाबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी 10 मार्च 2021 ला केलेल्या आदेशात सुधारणा करून मार्च चे वेतन 1 एप्रिल 2021 ला वितरित करण्याच्या व्यवस्थेची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे,

सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर,

अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24