अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे जिल्हा दौऱ्यावर होते.

यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय तुम्हाला भरपाई मिळवून देणारच. मात्र तुम्ही धीर खचून देऊ नका या शब्दात हताश झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देण्याचे काम मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे लोक प्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या सर्व नुकसानग्रस्त भागाचा शुक्रवारी दौरा केला. या पहाणी दौर्‍याच्या माध्यमातून केले.

जर कृषी कर्मचारी कामगार तलाठी पंचनामे करण्यासाठी आले नाहीत तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडली.

आधी पाऊस नव्हता म्हणून पीक वाया गेली. राहिली सायली होती ती थोड्याफार पाण्यावर जगवली..पण काही कळायच्या आत धो धो पाऊस झाला अन तीपण पावसाच्या वाहून गेली..

साहेब आमच्या शेतीचं लयं वाटोळंं झालं बघा..अशा व्यथा पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर मांडल्या.

यावेळी बोलताना ज्या ठिकाणी आधिकच्या पाण्यामुळे बंधार्‍या जवळील शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत टिकॅल टाकून तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्याचबरोबर ज्या शेतकर्‍यांच्या शेळ्या कोंबड्या व इतर पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे त्यांना देखील मदत करण्याची ग्वाही तनपुरे यांनी यावेळी दिली.