अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १० हजार १९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४२८ आणि अँटीजेन चाचणीत ३४९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ४८, जामखेड ४२, कर्जत ०६, नगर ग्रामीण ३८, पारनेर ३६, पाथर्डी ०६, राहुरी ०२, संगमनेर ११०, शेवगाव ५०, श्रीगोंदा २७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ०६, जामखेड ०४, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रा.१२, नेवासा ११९, पारनेर १९, पाथर्डी ०६, राहाता ४१, राहुरी ३५, संगमनेर ३३, शेवगाव १४, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ४३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४९ जण बाधित आढळुन आले. मनपा १३, अकोले २८, जामखेड १५, कर्जत २८, कोपरगाव १५, नगर ग्रा. १६, नेवासा १८, पारनेर ३१, पाथर्डी ३९, राहाता ३२, राहुरी १७, संगमनेर १०, शेवगाव २५, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर २८ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०१, अकोले ४१, जामखेड ३५, कर्जत ३६, कोपरगाव १२०, नगर ग्रामीण १५२, नेवासा १५७, पारनेर १५४, पाथर्डी २१८, राहाता १५३, राहुरी ७४, संगमनेर १६४, शेवगाव ५२, श्रीगोंदा १५३, श्रीरामपूर ३२०, कॅन्टोन्मेंट ०७, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा २४ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24