अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज २२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ६२८ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ४९१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३६ आणि अँटीजेन चाचणीत १९२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, कर्जत ०६, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०१, संगमनेर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले ०१, जामखेड ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रा.१०,
नेवासा ०९, पारनेर २१, पाथर्डी १६, राहता ०२, राहुरी १३, संगमनेर ०९, शेवगाव १०, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १९२ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, अकोले ०५, जामखेड २०, कर्जत २४, कोपरगाव ०३, नेवासा २८, पारनेर ३६, पाथर्डी २६, राहाता ०५, राहुरी ०७, संगमनेर ०४, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले २१, जामखेड १९, कर्जत ०६, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०७, नेवासा ११, पारनेर ३३, पाथर्डी १४, राहता १०, राहुरी १७, संगमनेर २२, शेवगाव १०, श्रीगोंदा २८ आणि श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)