आज ३७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २२०७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२०७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३ हजार ८३० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १११८ आणि अँटीजेन चाचणीत ७०५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १६, कर्जत ७७, नगर ग्रामीण ३८, नेवासा १०, पारनेर २२, पाथर्डी ०२, राहता २४, राहुरी ०६, संगमनेर ७५, शेवगाव ९०, श्रीगोंदा १५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६१, अकोले १७, जामखेड १०६, कर्जत ०६, कोपरगाव ४८, नगर ग्रा.६५, नेवासा ५३, पारनेर ४०, पाथर्डी ८७, राहाता ५२, राहुरी ११४, संगमनेर ६८, शेवगाव ६७, श्रीगोंदा १२०, श्रीरामपूर १८७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा २२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७०५ जण बाधित आढळुन आले. मनपा २४, अकोले ३३, जामखेड ०८, कर्जत ४४, कोपरगाव ६७, नगर ग्रा. ३८, नेवासा ३५, पारनेर ८२, पाथर्डी ६९, राहाता ३३, राहुरी ४३, संगमनेर ६४, शेवगाव २८, श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर ४८ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८६, अकोले २५०, जामखेड ११०, कर्जत १७०, कोपरगाव १४१, नगर ग्रामीण २५९, नेवासा ३९९, पारनेर ३१४, पाथर्डी १९०, राहाता २६४, राहुरी १६४, संगमनेर ६१२, शेवगाव २३३, श्रीगोंदा १७९, श्रीरामपूर १६५, कॅन्टोन्मेंट १२, मिलिटरी हॉस्पिटल ०५, इतर जिल्हा ५९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,३८,३७८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१३८३०
  • मृत्यू:२९६९
  • एकूण रूग्ण संख्या:२,५५,१७७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24