अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७२९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०२, नगर ग्रा. ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर २४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०६, जामखेड ०६, कोपरगाव ०४, नगर ग्रा.०६, पारनेर १२, राहता १८, राहुरी ०५, संगमनेर २५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळुन आले.
मनपा ०५, अकोले १५, जामखेड २७, कर्जत ३१, कोपरगाव १८, नगर ग्रा. ०५, नेवासा ०४, पारनेर ३७, पाथर्डी २०, राहाता १४, राहुरी ११, संगमनेर ०३, शेवगाव ०८, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले १७, जामखेड २९, कर्जत ३२, कोपरगाव ०६, नगर ग्रा. १४, नेवासा ३५, पारनेर ५४, पाथर्डी ३५, राहता २२, राहुरी २९, संगमनेर ३५, शेवगाव ३१, श्रीगोंदा ३६, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)