अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार २६४ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०६ आणि अँटीजेन चाचणीत २९८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये जामखेड ०१, नगर ग्रा. ०२, नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी १७, संगमनेर ३१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०२अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, जामखेड ७०, कर्जत १०, कोपरगाव ०४, नगर ग्रा.११, नेवासा १६, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहता ०१, राहुरी ०४, संगमनेर ३८, शेवगाव १८, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ११, आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २९८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले १३, जामखेड १७, कर्जत ३७, कोपरगाव १६, नगर ग्रा. १२, नेवासा ०७, पारनेर ६३, पाथर्डी २८, राहता १५, राहुरी १२, संगमनेर ३९, शेवगाव १२, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले २६, जामखेड ३२, कर्जत ८३, कोपरगाव ३४, नगर ग्रा. २७, नेवासा ३०, पारनेर १३५, पाथर्डी ५९, राहता १४, राहुरी २४, संगमनेर २१, शेवगाव ४९, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)