आज ७६१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २५ हजार ५८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार २२७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७९ आणि अँटीजेन चाचणीत २७० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये जामखेड १०, नगर ग्रामीण १४, नेवासा ०१, पारनेर १८, पाथर्डी २९, राहता ०२, राहुरी ०१, संगमनेर २२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ५६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि , इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०३, अकोले ०८, जामखेड ०२, कर्जत १४, कोपरगाव १६, नगर ग्रा.२२, नेवासा १५, पारनेर १३, पाथर्डी ०३, राहाता ५१, राहुरी २४, संगमनेर ४१, शेवगाव २९, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १६ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७० जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले २१, जामखेड १२, कर्जत २९, कोपरगाव ३२, नगर ग्रा. ०८, नेवासा १२, पारनेर २८, पाथर्डी १७, राहाता ०६, राहुरी ०७, संगमनेर ४३, शेवगाव ३७, श्रीगोंदा १४ आणि श्रीरामपुर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले १३६, जामखेड १२, कर्जत ३४, कोपरगाव १८, नगर ग्रा. २७, नेवासा ५८, पारनेर ७४, पाथर्डी २५, राहाता ४८, राहुरी १९, संगमनेर ११५, शेवगाव ५०, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर १९, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,२५,५८६

उपचार सुरू असलेले रूग्ण:५२२७

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७१२

एकूण रूग्ण संख्या:३,३७,५२५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर लाईव्ह 24