आज ७६९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७४६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १३ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ७५१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२८ आणि अँटीजेन चाचणीत २५३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ०३, जामखेड १९, कर्जत ०३, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पारनेर २३, पाथर्डी २७, राहता ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०२, श्रीगोंदा ५७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ३३, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव ०३, नगर ग्रा.१९, नेवासा १२, पारनेर २६, पाथर्डी ०८, राहाता २७, राहुरी ०९, संगमनेर १०१, शेवगाव २६, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २५३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले ४२, जामखेड ०४, कोपरगाव ०६, नगर ग्रा. १७, नेवासा ३१, पारनेर ३५, पाथर्डी ०७, राहाता ११, राहुरी २४, संगमनेर २२, शेवगाव १९, श्रीगोंदा २१, श्रीरामपुर ०६ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ६४, जामखेड १३, कर्जत ४३, कोपरगाव १२, नगर ग्रा. ६१, नेवासा ३९, पारनेर ६२, पाथर्डी ३५, राहाता ४६, राहुरी ४५, संगमनेर २१६, शेवगाव ४१, श्रीगोंदा ४९, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,१३,५६२

उपचार सुरू असलेले रूग्ण:५७५१

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६५६७

एकूण रूग्ण संख्या:३,२५,८८०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)