अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ९२७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९३ हजार ८५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६८१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९७ आणि अँटीजेन चाचणीत ३२७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, अकोले २६, जामखेड ४९, कर्जत ०३, नगर ग्रा. ०३, नेवासा ०२, पारनेर ४५, पाथर्डी ०५, राहुरी ०१, संगमनेर ०७, शेवगाव ०२, श्रीगोंदा ३५, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले १३, जामखेड ०५, कर्जत १२, कोपरगाव ०७, नगर ग्रा.२८, नेवासा २७, पारनेर १५, पाथर्डी ०४, राहता २८, राहुरी १४, संगमनेर ७२, शेवगाव २८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १७ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३२७ जण बाधित आढळुन आले.
मनपा ०७, अकोले २५, जामखेड ०४, कर्जत २२, नगर ग्रा. १२, नेवासा ३६, पारनेर ४६, पाथर्डी ३२, राहता १५, राहुरी १६, संगमनेर ३५, शेवगाव ३३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले २८,
जामखेड १०२, कर्जत ७७, कोपरगाव ३२, नगर ग्रा. २८, नेवासा ३७, पारनेर ७८, पाथर्डी ५५, राहता ४०, राहुरी ५४, संगमनेर १२८, शेवगाव १००, श्रीगोंदा ८२, श्रीरामपूर ४९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा २० अशा रुग्णांचा समावेश आहे.