आज राज्यातील सराफ सुवर्णकारांचा लाक्षणिक संप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस)ने हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयूआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ, राज्यभरातील सुवर्णकार हे सोमवारी (दि. २३) एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत.

अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने (बीआयएस) शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किंग कायदा अमलात आणला.

देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागत देखील केले. परंतु बीआयएसने शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत, हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची पद्धत आणली.

तसेच हे बदल करताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता केले गेले. सदर पद्धतीमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार आहे.

याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्यावतीने २३ ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24