अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात मोठी बातमी : पत्रकार हत्येत आली ‘ही’ नावे समोर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- राहुरीत पत्रकाराचा अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता,या प्रकरणात आता काही नावे समोर आली आहेत. 

धक्कादायक माहिती समोर :- पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अपहरणासाठी वापरलेली जीप कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांची असल्याचे निष्पन्न झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिवे मारण्याची धमकी दिली होती … सविता दातीर यांनी सायंकाळी पुरवणी जबाबात, “मोरे यांनी आपल्या पतीस मारहाण केली होती, तसेच कारभारी, रावसाहेब व बाळासाहेब मांगुडे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती,’ असे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याना  चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुख्य संशयित कान्हू मोरे पसार :- जबर मारहाण करून, गळा आवळून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मुख्य संशयित कान्हू मोरे पसार आहे. तो पोलिसांच्या हाती लागल्यावर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी मोरेचा शोध सुरू आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24