अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात मोठी बातमी : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात ट्वीस्ट, सविता बोठे पाटील म्हणाल्या…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जर हत्याकांड प्रकरणात ट्वीस्ट आला आहे काल रेखा जरे यांच्या मुलाने सविता बोठे पाटील यांनी धमकावले असल्याचा आरोप केला होता,याबाबत सविस्तर बोठे पाटील यांनी नवा खुलासा केला असून याबाबत चे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेले निवेदन वाचा जसेच्या तसे – 

मी अँड. सविता बाळासाहेब बोठेपाटील आणि माझा मुलगा यश दि. २७ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता पारनेर कोटामध्ये माझ्या मुलाचा मोबाईल अधिकारी यांनी जप्त केला होता.

त्यासंदर्भात कोर्ट केस चालू आहे. त्याच वेळेस रुणाल जरे आणि त्याचा अंगरक्षक तसेच त्याचा वकीलही तिथे हजर होते त्यांनी मला व माझा मुलगा यशकडे रागाने पाहून दमदाटी केली.

माझे दीर श्री. अनुपम आणि मी दि. २७ जुलै २०२१ रोजी सकाळी १२.१५ वाजता माझे पती आरोपी श्री. बाळासाहेब बोठे यांना भेटण्यासाठी दुय्यम कारागृहामध्ये जेलर यांची रितसर परवानगी घेऊन गेले असता पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये फिर्यादीचा नातू रुणात्र जरे व त्याचा अंगरक्षक अमोल शिरसाठही त्यावेळेस तेथेच होते.

माझ्या पतीचा घाबरलेला आवाज ऐकून मी गेले असता त्यांनी सांगितले की, रुणाल जरेचा अंगरक्षक आतमध्ये येऊन माझ्याकडे बंदुकीचे मूख रोखून तुला बघून घेऊ, सगळा माज उतरवू, अशी धमकी रुणालर
जरेच्या सांगण्यावरून दिली.

त्यानंतर मी स्वतः पी.आय. गोकावे साहेबांकडे याबाबत तक्रार करण्यासाठी जात असताना रुणाल व त्याच्या अंगरक्षकाने मलासुद्धा अश्लील भाषेत शिवीगाळ करून आमच्याबरोबर प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि मीडिया आहे. आमचे कोणी काय वाकडे करू शकत नाही.

तुझ्यावर व तुझ्या घरच्यांवर खोटे गुन्हे दाखल करू, बोठेवरपण खोटे गुन्हे दाखल केले आहेत व अजून खोटे गुन्हे दाखल करू, त्यांना बाहेर येऊ देणार नाही. तुझ्या मुलांनापण बघून घेईल असा दम दिला.

या सर्व गोष्टींची तक्रार करण्यासाठी मी पी. आय. गोकावे साहेब यांच्याकडे गेले असता त्यांनी फक्त म्हणणे ऐकून घेऊन आरोपींना जर सर्व सुविधा मिळू शकतात मग आमचा पोलीस कुठेही जाऊ शकतो,आम्हा पोलिसांचे कोणीच काही वाईट करू शकत नाही, असे म्हणून त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितले.

या सर्व प्रकारात एकच प्रश्‍न वारंवार पडतो की, रुणाल जरे व त्याचा अंगरक्षक यांचे पारनेर कोर्ट व पारनेर जेत्रमध्ये काहीच काम व संबंध नसताना अनेकदा चकरा का होतात? या सर्व गोष्टींचा माझ्या मुलास व मला बराच मानसीक त्रास झाला.

त्या दिवशी मी गोळ्या घेऊन झोपले. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी आपल्यासमोर आज दि. २९ जुलै २०२१ रोजी अर्ज देत आहे. एकंदरीत आतापर्यंत झालेल्या सर्वे प्रकार पाहता कोर्टाच्या कामानिमित्त मला आणि माझ्या मुलांना घराबाहेर पडावे ल्रागत असते. या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या मुलांना तसेच मला रुणाल जरे, त्याचा अंगरक्षक व वकील सचिन पटेकर यांच्यापासून धोका आहे

मागील ७ ते ८ महिन्यांपासून आम्हाला पोलिसांची चांगलीच सवय झालेली आहे. तसेच हा जो काही
प्रकार झालेला आहे. याबद्दल आम्ही कठलीही तक्रार करणार नव्हतो मात्र फिर्यादीच्या नातूने माझ्याविरुद्ध जे खोटे निवेदन दिलेले आहे आणि भविष्यात अजुन त्याच्याकडून माझ्या परिवारास व मला त्रास होऊ नये म्हणून सदरचा अर्ज नाईलाजास्तव आपल्याकडे देत आहे.

सदरचा सर्व प्रकार खरा असन, आपल्यामार्फत योग्य ती माहिती घेण्याची विनंती आहे. तसेच झालेल्या सर्वे प्रकारणावर रुणात्र जरे याची तसेच माझी नार्को चाचणी करण्याची विनंती असन, तो दोषी आढळल्यास त्याची व त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध कायटेशी कारवाई करण्यात यावी.

झालेल्या सर्व प्रकार पारनेर जेलच्या सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद असून ते तपासण्याचीही विनंती तुमच्याकडे करते. तसेच त्याचे फुटेज आम्हाला मिळण्याची देखील विनंती आहे. असे निवेदन सविता बोठे पाटील यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24