मेष : कुटुंबियांना आज शुभ वार्ता मिळेल. आज आपल्याला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराकडून आपल्याला नवी माहिती मिळणार आहे. आरोग्याची कुरबूर राहिल.इतरांचा निषेध टाळा. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील.
वृषभ :आज आपल्याला अनेक अनुभव येतील शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायात आपल्याला फायदा मिळेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत जास्त भावुक व्हाल.
मिथुन :जास्त ताण घेण्याचे टाळा आणि कामाच्या दरम्यान स्वत: ला ब्रेक द्या. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. कार्यालयात महत्त्वपूर्ण चर्चा होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती मिळेल.
कर्क :आजचा दिवस एक उत्तम दिवस ठरणार आहे. व्यवसायातील कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी पुनर्विचार करणे महत्वाचे आहे. जीवनात आणि कामात प्रगती होण्याच्या संधी असतील. वाहन चालवताना खबरदारी घ्या.
सिंह :आज तुमची दिनचर्या बदलेल. संपत्ती मिळण्याच्या उद्देशाने वेळ अनुकूल आहे. शक्य असल्यास बचतीच्या रकमांचा शेवटचा पर्याय म्हणून खर्च करा. वादग्रस्त विषयांपासून दूर रहा.
कन्या :आजच्या दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक विचारांनी होईल. आज ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणात कराल. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे.
तुळ :आज आपल्याला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवासायत कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.कोणत्याही व्यवहाराचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आपल्या प्रियजनांचे प्रेम मिळाल्यानं आनंदी असाल.
वृश्चिक :आज आपल्याला लाभ मिळेल. आत्मविश्वास आणि मेहनतीमुळे आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचता येईल.घरकाम आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्येही व्यस्त असेल.
धनु :नवीन लोक तुम्हाला व्यवसायात सामील होऊ शकतात. कोणालाही नवीन ज्ञान किंवा अनुभव मिळू शकेल. तुम्हाला अचानक पैसे मिळतील. घराचे वातावरण आनंदाने भरलेले असेल.
मकर :काहीतरी नवीन सुरू होऊ शकते. पूर्वीपेक्षा आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. आपण वैयक्तिक जीवनाकडे तसेच व्यवसायिक जीवनाकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. वाईट सवयी आणि वाईट संगतीपासून दूर रहा.
कुंभ :तुम्हाला तुमचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी काही नवीन मार्ग सापडेल. वैद्यकीय किंवा सामान्य स्टोअरमध्ये काम करणार्यांना चांगला नफा मिळवून देण्याचा दिवस.
मीन :आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. वडिलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याविना कोणतंही काम करू नका. आज दिवसभर सतर्क राहाणं गरजेचं आहे.