अहमदनगर जिल्ह्यातील आजची घटना : पति-पत्नी आज उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर समोर आले हे धक्कादायक दृश्य…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असुन कालच हे पति-पत्नी आपल्या मुलाना भेटून घरी आले.

सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे पति-पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर दोघेही रक्ताने भरलेले आणि त्यांच्या डोक्याजवळ फावडे रक्तानी भरलेले

पहिल्या नंतर स्थानिकानी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली. राहाता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु केला आहे.

अतिरिक्त पोलीस अध्यक्ष दिपाली काळे आणि पोलीस उपअधिकारी संजय सातव सह मोठा पोलीस फ़ौज फाटा घटनास्थळी दाखल झाला.

या पती-पत्नीवर पावड्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती समोर येत असुन यांच्या हत्याच्या मागचे कारण आद्यपही अस्पष्ट असुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24