टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मागील वर्षी मार्चमध्ये कोरोना संकट आले. लॉकडाऊन लागले. परिणाम जाणवले नाही, मात्र सर्वांना त्याची झळ बसली. सर्वाधिक फटका शेतकरी आणि मजुरांना बसला.

रोजगार फक्त शेती पुरक व्यवसायतुन मोठ्या प्रमाणात मिळतो. २०२० मध्ये हे व्यवसाय प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले. जनजीवन सुरळीत होत असतानाच कोरोनामुळे तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

व्यवसायात टोमॅटो उत्पादक शेतकरी महत्वाचा घटक आहे. हजारो मजुरांना रोजगार देणारा हा व्यवसाय कोरोना भितीमुळे संकटात आहे. टोमॅटो पीक भांडवली असल्याने बरेच शेतकरी या फंद्यात पडत नाही.

बँक कर्जाच्या बोजाखाली आधीच शेतकरी वर्ग मानसिक तनावाखाली आहे. दोन वर्षापासुन हातात फारसे काही पडले नाही. त्यात अवकाळीने घात केला. कोरोनाने पुर्ण सिझन वाया गेले.

आता पुन्हा कोराेनाने डोके वर काढल्याने लॉकडाऊनची टांगती तलवार टोमॅटो उत्पादकांवर आहे. तालुक्यात सध्यस्थितीला टोमॅटो फडामध्ये फारसे मजुर दिसत नसल्याने ओस पडले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24