Sri Lanka News : कोलमडेली अर्थव्यवस्था आणि त्यातून उसळलेला जनतेचा रोष हे चित्र अलीकडेच श्रीलंकेत पहायला मिळाले. आता अशीच अवस्था पाकिस्तानची होत आहे.
त्यामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आयएमएफकडे बेलआउट पॅकेजची मागणी केली आहे. पाकिस्तान सध्या खूप अडचणींचा सामना करत आहे.
आधीपासूनच आर्थिक संकट त्यात तालिबानशी संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानचे पुराने कंबरडे मोडले आहे. पुराने विस्थापित झालेल्या नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी पैसे जमा करण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानी सरकारपुढे आहे.
त्यातच महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. राजधानी लाहोरमध्ये टोमॅटोचा भाव ५०० रुपये किलो तर कांद्याचा भाव ४०० रुपये किलो झाला आहे.
१ किलो बटाट्यासाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत. सर्वच खाद्यपदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे नैसर्गिक आपत्ती सुरु असताना महागाईचा आगडोंब उसळला आहे.
भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करू शकते.
सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये टोमॅटो आणि कांद्याचा पुरवठा केला जात आहे.