टोमॅटो वजन कमी करण्यासह ‘ह्या’ १० आरोग्याच्या समस्या करेल दूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक भाज्या फळ भाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करून घेत असतो. सर्वाधिक जास्त आपण आपल्या रोजच्या आहारात किंवा आपल्या स्वयंपाक घरात टोमॅटो चा जास्तीजास्त वापर करत असतो.

स्वयंपाक घरात टोमॅटोशिवाय कोणतीही ग्रेव्ही रेसिपी तयार होऊ शकत नाही. दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचा वापर आपण भाजी म्हणूनच करतो. पदार्थाला चांगली चव येण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो. परंतु आज आम्ही तुम्हाला टोमॅटोपासून होणारे फायदेही सांगणार आहोत.

  • १) वजन नियंत्रण: टोमॅटो रोज खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
  • २) सशक्त हाडे: हाडांच्या बळकटीसाठी टोमॅटो फार उपयोगी पडतात.
  • ३) दृष्टी सुधारते : ज्यांना कमी दिसते अशा लोकांची टोमॅटोमुळे डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी फायदा होतो.
  • ४) शरीरात ऊर्जा येते: टोमॅटोचा ज्यूस पिल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
  • ५) बीपी कंट्रोल: टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे.
  • ६) हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन करणे फार गुणकारी असते.
  • ७) टोमॅटोमध्ये केरोटीन हे तत्व असते. जे शरीरातील वेदना दूर करण्यास मदत करतो.
  • ८) टोमॅटोमध्ये फायबर भरपूर असतात जे वजन कमी करण्यास मदत करते व पोट भरल्यासारखे राहते.
  • ९) वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यास टोमॅटो उपयुक्त आहे.
  • १०) वाढत्या सुरकुत्या रोखण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. त्यात आढळणारी लाइकोपीन कॅरोटीनोईड्ससारखे कार्य करते. हे त्वचेचे पेशी खराब होण्यापासून बचाव करते. यामुळे हळू हळू तुमचा चेहरा ग्लो करेल. परंतु चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका, चेहऱ्यावर रिएक्शन होण्याची शक्यता असते.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24