Top 4 Budget Cars : होईल लाखोंची बचत! सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या ‘या’ 4 कार्स खरेदी करा अवघ्या 5 लाखांत, पहा यादी
Budget Cars : मागील महिन्यापासून कार खरेदी करणे महाग झाले आहे. ग्राहकांना आता जर एखादी नवीन कार खरेदी करायची असेल तर पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. अशातच तर तुम्ही कमी किमतीत कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण तुम्ही आता काही कार्स अवघ्या 5 लाखांमध्ये खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व कार सर्वोत्कृष्ट मायलेज देतात. इतकेच नाही तर यात 7 सीट पर्याय मिळत आहे. दरम्यान कोणत्या आहेत या कार्स जाणून घेऊयात सविस्तर.
मारुती अल्टो K10
कंपनीकडून ही बजेट सेगमेंट कार 3.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला अनुक्रमे Std, Lxi, Vxi आणि Vxi+ असे चार प्रकार पाहायला मिळतात. यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन असून ज्याची क्षमता जास्तीत जास्त 67 bhp आणि 89Nm टॉर्क जनरेट करण्याची आहे.
रेनॉल्ट क्विड
कंपनीकडून ही बजेट सेगमेंट कार 4.70 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आलं आहे. यात तुमच्यासाठी दोन इंजिन पर्याय उपलब्ध असणार आहेत. ज्यात पहिले 0.8 लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असून दुसरे 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात तुम्हाला ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशन पाहायला मिळू शकते.
मारुती Eeco MPV
कंपनीकडून ही बजेट सेगमेंट कार 5.27 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही 7 सीटर कार असून ज्यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 72.4 bhp आणि 98 Nm टॉर्क जनरेट करेल.
मारुती सुझुकी एस प्रेसो
मारुतीची ही बजेट सेगमेंट कार 4.26 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीकडून यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ज्याची क्षमता जास्तीत जास्त 66 bhp आणि 89Nm टॉर्क जनरेट करण्याची आहे. यात तुम्हाला CNG चा पर्याय मिळेल. कंपनीच्या या कारमध्ये 32 kmpl चा मायलेज मिळेल.