ताज्या बातम्या

Top 6 Most Unsafe Indian Car : सुरक्षेच्या बाबतीत ‘या’ कार्सना मिळाले आहे खूप खराब सेफ्टी रेटिंग, चुकूनही खरेदी करू नका; पहा यादी

Published by
Ahmednagarlive24 Office

Top 6 Most Unsafe Indian Car : दरवर्षी लाखो लोक गाड्या खरेदी करत असतात. परंतु सध्याचे अपघाताचे प्रमाण पाहता सध्या ग्राहक वाहनाच्या सुरक्षिततेचा खूप जास्त विचार करत आहेत. अनेक कंपन्या वाहने बनवत असताना फक्त तिच्या लुक्स आणि फिचर्सचा विचार करत नाहीत.

सेफ्टी फीचर्सचाही विचार करतात. परंतु, मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत ज्या बाहेरून शक्तिशाली असून सुरक्षेच्या बाबतीत या कार मागे पडतात. असे असले तरी अनेकजण या कार खरेदी आहेत. त्यामुळे अपघात देखील होत आहेत.

  • Maruti Suzuki SPRESSO

मारुतीची सुझुकीची ही तिसरी कार आहे. काही दिवसांपूर्वी ही कार लाँच झाली असून लाँच होताच या कारने धुमाकूळ घातला आहे. परंतु सेफ्टी रेटिंगचा विचार केला तर कार सुरक्षेच्या दृष्टीने चांगली नाही.

  • Maruti Suzuki Ignis

मारुतीचीच ही दुसरी कार आहे. ही कार देखील तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी योग्य नाही. मात्र सेफ्टी रेटिंगमध्ये या कारला फक्त १ स्टार मिळाला आहे. किमतीचा विचार केला तर तिची ५. ३५ लाख रुपयांपासून ७. ७२ लाख रुपयांपर्यंत जाते.

  • Maruti Suzuki Swift

मारुतीची ही हॅचबॅक कार असून कंपनीची ही सर्वात लोकप्रिय कार आहे. बऱ्याचदा तुम्ही ही कार पहिली असेल मात्र सेफ्टी रेटिंगमध्ये या कारला फक्त १ स्टार मिळाला आहे.

  • Hyundai i10 Nios

शानदार लूक आणि फीचर्स या कारमध्ये तुम्हाला मिळतात. परंतु ही कार सेफ्टीच्या बाबतीत कमकुवत आहे. ग्लोबल NCAP कडून या कारला अवघे २ स्टार दिले आहेत. किमतीचा विचार केला तर ही कार ५. ५४ लाख रुपये ते ८. ५५ लाख रुपयांपर्यंत खरेदी करता येत आहे.

  • Maruti Suzuki Wagon R

मारुती सुझुकीची ही सर्वात लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक शानदार फीचर्स दिले असून स्वस्तात ही कार खरेदी करता येते. परंतु या देखिल कारच्या सेफ्टी रेटिंगचा विचार केला तर या कारला ग्लोबल एनसीएपी कडून फक्त २ स्टार मिळाले आहेत. या कारची किंमत ५. ५ लाख रुपये ते ७ लाख रुपये इतकी आहे.

  • रेनो क्विड

लवकरच रेनो क्विड बाजारात येणार आहे. मार्केटमध्ये या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. किमतीचा विचार केला तर या कारची किंमत ४.७० लाख रुपयांपासून सुरु होते तर एक्स शोरूम किंमत ५. ९९ लाख रुपयांपर्यंत जाते. लहान कुटुंबासाठी ही कार उत्तम आहे. परंतु सेफ्टी रेटिंगमध्ये ग्लोबल एनसीएपी कडून या कारला फक्त २ स्टार मिळाले आहेत. त्यामुळे जर तुम्हीही येत्या काळात ही कार खरेदी करणार असाल तर ती अजिबात सुरक्षित नाही.

Ahmednagarlive24 Office