Toyota Best SUV : टोयोटाने घेतला मोठा निर्णय ; अचानक ‘ही’ दमदार एसयूव्ही केली रिकॉल ! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Toyota Best SUV : भारतीय ऑटो बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी Toyota ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतल्या या निर्णयानुसार कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही Toyota Urban Cruiser Hyryder SUV च्या तब्बल 994 युनिट्स रिकॉल केले जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच टोयोटाने ही जबरदस्त SUV लॉन्च केली होती. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो Toyota Urban Cruiser Hyryder एसयूव्ही आपल्या जबरदस्त फीचर्स आणि दमदार मायलेजमुळे ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी एसयूव्ही आहे. कंपनी ही एसयूव्ही सीएनजी व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे. चला तर जाणून घ्या कंपनीने या कारला का रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे.

The new Toyota Urban Cruiser hyryder is available in 11 color

Advertisement

म्हणून रिकॉल

Toyota Urban Cruiser Hyryder SUV ला तिच्या फ्रंट सीट बेल्ट शोल्डर हाईट ऍडजस्टमेंट प्लेट असेंबलीमध्ये समस्या आल्याने रिकॉल करण्यात आली आहे. जर कंपोनेंट काम करू शकत नसेल तर सीट बेल्ट वेगळा केला जाऊ शकतो.

फ्री सर्विस

Advertisement

रिकॉल केलेल्या कारमध्ये समस्या आढळल्यास, ऑटोमेकर अधिकृत सेवा आउटलेटवर खराब कंपोनेंट विनामूल्य बदलेल. रिकॉल केलेल्या कार्सच्या मालकांनी टोयोटा डीलरशीपने त्वरित संपर्क साधणे अपेक्षित आहे. कार मालकाची इच्छा असल्यास, तो कंपनीच्या अधिकृत कस्टमर केअरला कॉल करून त्याच्या कारबद्दल जाणून घेऊ शकतो.

इंजिन आणि गिअरबॉक्स

Toyota Urban Cruiser Hyryder दोन इंजिन पर्यायांसह येते. त्यापैकी एक 1.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल आहे ज्यामध्ये माइल्ड हायब्रिड इंजिन आहे. हे 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. दुसरा पर्याय 1.5-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल हायब्रिड इंजिन आहे, जो CVT गिअरबॉक्सशी जोडलेला आहे.

Advertisement

The new Toyota Urban Cruiser Harrier is available in 11 color

किंमत

टोयोटाच्या या मिड साइजच्या एसयूव्हीच्या माइल्ड हायब्रिड पर्यायाची किंमत 10.48 लाख ते 17.19 लाख रुपये आहे. त्याच वेळी, टॉप स्पेसिफिकेशनसह व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तर, हायब्रिड इंजिन पर्यायाची किंमत 15.11 लाख ते 18.99 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Advertisement

हे पण वाचा :- Fixed Deposit: महागाईत दिलासा ! ‘या’ बँकेने FD व्याजदरात केला मोठा बदल ; आता ग्राहकांना होणार ‘इतका’ फायदा