ट्रॅक्टर दुकानात घुसला, अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणची घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोल्हार येथे विना चालकाचा ट्रॅक्टर अनेक दुकानांत घुसला. दैव बलवत्तर म्हणून कुठलीही हानी झाली नाही.

मात्र या घटनेत वित्तहानी झाली आहे. वाहनाचा फिटर व चालक यात कोणाचा दोष हीच चर्चा आहे. गुरुवारी दुपारी नगर मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथे एक ट्रॅक्टर नादुरुस्त झाला.

त्याचे दुरुस्तीचे काम येथील एक फिटर रस्त्यालगत करीत होता. वाहनाचा चालक तेथेच होता.

दरम्यान, ट्रॅक्टरच्या बॅटरीचे व इतर काम पूर्ण झाल्यावर फिटरने चेक करण्यासाठी ट्रॅक्टर सुरू केला.

फिटरने ट्रॅक्टर सुरू करताच तो गियर मध्ये असल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर निघाला. पुढे अनेक वाहने कोल्हार-बाभळेश्वर रस्ता नादुरुस्त असल्याने एकाच दिशेने वाहत होती.

मात्र दैव बलवत्तर म्हणून ट्रॅक्टर उजव्या बाजूने सुसाट निघाला. अन थेट बाजूला असलेल्या एका दुचाकीला फरफटत पूढे दोन ते तीन दुकानात घुसला.

यावेळी दुकानातील माल व इतर बरेच नुकसान झाले. परंतु विना चालकाचा ट्रॅक्टर आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात तेथील व्यावसायिकांनी दुकान सोडून धूम ठोकली.त्यामुळे दुकानातील अनेकांचा जीव भांड्यात पडला.

सदर ट्रेकटर रस्त्यावर गेला असता तर अनेक अपघात घडून अनेकांना नक्कीच जीव गमवावा लागला असता. या घटनेत ट्रॅक्टर चालकाची चूक होती की वाहन दुरुस्त करीत होता. त्याची हे समजले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24