ताज्या बातम्या

Traffic Challan Rules : चुकूनही ‘या’ लोकांना देऊ नका लिफ्ट, अन्यथा कापले जाईल तुमचे चलन,जाणून घ्या नियम

Published by
Ahmednagarlive24 Office

Traffic Challan Rules : ट्रॅफिकबाबत नवीन नियम (Traffic Rule) लागू केले आहेत. मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) 66/192 अंतर्गत, जर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. (Traffic Challan)

दुचाकी (Bike) चालवत असताना बऱ्याचदा आपण अनोळखी व्यक्तीला (Stranger)लिफ्ट (Lift) देता. तुम्ही जर अशी चूक करत असाल तर आजच ही टाळा. (Avoid) या कृत्याशी संबंधित एक प्रकरण मुंबईत (Mumbai) समोर आले आहे.

यादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्या खासगी वाहनातून अज्ञात व्यक्तीला लिफ्ट दिली. त्याचवेळी वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून मागे कोण बसले आहे, अशी विचारणा केली. त्यादरम्यान त्या व्यक्तीने सांगितले की तो एक अनोळखी व्यक्ती आहे, ज्याला त्याने पुढे नेण्यासाठी लिफ्ट दिली आहे.

यानंतर वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदा 66/192 अन्वये त्याचे 2 हजार रुपयांचे चलन कापले. त्यावेळी ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.त्यामुळे तुम्हाला या नियमाची जाणीव असायला हवी.

अज्ञात व्यक्तींना लिफ्ट देणे वाहतूक नियमांनुसार बेकायदेशीर आहे. नियमांनुसार, फक्त व्यावसायिक वाहनांना ही परवानगी आहे ज्यामुळे इतर लोकांना व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करण्याची परवानगी आहे.

त्याचबरोबर खासगी वाहनांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येणार नाही. जर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनांमध्ये अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देत असाल तर. अशा परिस्थितीत, आपण हे करणे त्वरित थांबवावे. वाहतूक नियमांनुसार हे बेकायदेशीर कृत्य आहे.

Ahmednagarlive24 Office