ताज्या बातम्या

Traffic Rule : दुचाकीस्वारांनो सावधान.. आता हेल्मेट घातले तरीही तुमचे कापले जाणार 2000 रुपयांचे चलन, जाणून घ्या नवीन नियम

Traffic Rule : जर तुम्हीही दररोज दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशात दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करत असते. तरीही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही.

वाहतुकीबाबत नियम कडक केले असले तरीही अनेकजण नियमाचे उल्लंघन करत आहेत. अशातच आता तुम्ही हेल्मेट घातले तरीही तुमचे 2000 रुपयांचे चलन कापले जाणार आहे. हा नवीन नियम जाणून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.

कधी घालावे हेल्मेट?

तुम्ही दुचाकी चालवण्यापूर्वी किंवा वर बसण्यापूर्वी हेल्मेट घालावे. हे खूप गरजेचे आहे जेणेकरून अपघातादरम्यान तुमच्या डोक्याला कोणतीही दुखापत होणार नाही. बऱ्याच अपघाताच्या घटनांमध्ये डोक्याला दुखापत झाली असल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे.

जेव्हाही तुम्ही हेल्मेट घालाल तेव्हा ते तुमच्या डोक्यावर चांगले बसवा. तसेच हे लक्षात ठेवा की हेल्मेट घातले की त्यानंतर पट्टी लावायला विसरू नका. अनेक वेळा अनेकजण हेल्मेटचा वापर केवळ चलन टाळण्यासाठी करतात. अनेकांच्या हेल्मेटला पट्टीचे कुलूप नसते किंवा ते तुटलेले असते.

असे कापले जाणार 2000 रुपयांचे चलन

भारत सरकारकडून 1998 च्या मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. यात दुचाकीस्वारांकडून हेल्मेट न घातल्याबद्दल किंवा योग्य प्रकारे हेल्मेट न घातल्यामुळे तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे आता जर दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असेल, पण ते उघडे असेल, तर त्याच्यावर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

जरी तुम्ही हेल्मेट घातले असेल आणि तुम्ही त्याचा पट्टा घट्ट घातला नसेल तरीही तुमच्याकडून 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता हेल्मेट नीट घालावे लागणार आहे. जर असे न झाले तर, तुमच्याकडून 2000 रुपयांचे चलन कापले जाणार आहे.

ISI मार्क असावे

जर तुमच्या हेल्मेटवर बीएसआय चिन्ह नसेल तर, तुमच्याकडून 1,000 दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे बाईक-स्कूटर चालवत असताना तुम्हाला फक्त ISI मार्क असणारे हेल्मेट घालावे लागणार आहे. नाहीतर मोटार वाहन कायद्याच्या कलम 194D MVA अंतर्गत, तुमच्याकडून 1,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts