Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Traffic rules : ट्रॅफिक हवालदारांना तुमच्या वाहनांची हवा किंवा चावी काढता येते का? काय सांगतो नियम जाणून घ्या

Traffic rules : रस्त्यांवर कोणतेही वाहन चालवायचे असेल तर वाहन चालकांना नियम पाळावे लागतात. परंतु अनेकजण घाईत, अनवधानाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हे नियम मोडतात. बाइक चालवत असताना हेल्मेट न वापरणे, कारमध्ये सीट बेल्ट न लावणे तसेच सिग्नलचं उल्लंघन करणे यांसारखे असे प्रकार अनेकांकडून घडतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहन चालकावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असतो. परंतु कारवाई करत असताना काही पोलिसांकडून गैरवर्तन घडल्याचे समोर येत असते. वाहतूक हवालदारांना तुमच्या वाहनांची हवा किंवा चावी काढता येते का? जाणून घेऊया.

कायदा काय सांगतो जाणून घ्या

भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अन्वये, केवळ ASI स्तरावरील अधिकारीच रहदारीच्या उल्लंघनावर तुमचे चलन कापून घेता येते. इतकेच नाही तर एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांनाही दंड लावण्याचा अधिकार असून त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हे हवालदारच असतात.

परंतु त्यांना कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार नसतो. तसेच त्यांना तुमच्या कारच्या टायरमधील हवाही काढता येत नाही. इतकेच नाही तर त्यांना तुमच्याशी बोलता येत नाही किंवा गैरवर्तनही करता येत नाही. समजा वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करता येते.

विसरू नका या गोष्टी

  • वाहतूक पोलिसांकडे तुमचे चलन कापण्यासाठी चलन बुक किंवा ई-चलन मशीन असावे. समजा त्यांच्याकडे या दोन्हीपैकी काहीही नसल्यास त्यांना तुमचे चलन कापता येत नाही.
  • तसेच वाहतूक पोलिसांनीही गणवेशात असावे. त्यांच्या गणवेशावर बकल नंबर आणि त्यांचे नाव असणे गरजेचे आहे.
  • हे लक्षात ठेवा की हेड कॉन्स्टेबल तुम्हाला केवळ 100 रुपये दंड करू शकतात. तसेच जास्तीत जास्त दंड केवळ वाहतूक अधिकाऱ्यांना म्हणजे ASI किंवा SI करता येत आहे.
  • समजा ट्रॅफिक कॉन्स्टेबलने तुमच्या गाडीची चावी काढल्यास त्या घटनेचा व्हिडिओ बनवा. तुम्हाला हा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून त्या भागातील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करता येते.
  • वाहन चालवत असताना तुमच्यासोबत ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मूळ प्रत तुमच्यासोबत असावे. तसेच वाहनाची नोंदणी आणि विम्याची छायाप्रतही असावी.
  • जर तुमच्याकडे त्या जागेवर पैसे नसतील तर, तुम्ही नंतर तो दंड भरू शकता. न्यायालय चलन जारी करत असून जे न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकाऱ्यांना तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवतात.

या कलमानुसार केली जाते कारवाई

याबाबत माहिती देत असताना अधिवक्ता गुलशन बगोरिया यांनी असे सांगितले आहे की, मोटार वाहन कायदा 1988 ने वाहन तपासणीदरम्यान वाहनाच्या चाव्या काढण्याचा अधिकार हा कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही. पोलिस कर्मचार्‍यांनी तपासणी दरम्यान, वाहनचालक परवाना मागितला तर वाहनाशी निगडित कागदपत्रे वाहन मालकाने तात्काळ दाखवणे गरजेचे आहे.

सर्व वाहन चालकांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 3, 4 नुसार, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूप गरजेचे आहे. हे लक्षात घ्या की कलम 183,184, 185 अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे.

इतकेच नाही तर या कायद्यांतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे इत्यादी कलमांतर्गत वाहन चालकांना 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत शिक्षा, एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होते.