मुखात हरिनामाचा गजर आणि किर्तनसेवा चालू असतानाच या किर्तनकाराचे दु:खद निधन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगात हरिनामाच्या कीर्तनातून घरघरापर्यंत पोहचलेले किर्तनकार ताजुउद्दिन महाराज शेख यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास किर्तन चालू असताना दु:खद निधन झाले.(Kirtankar Tajuddin Maharaj Sheikh passed away)

किर्तनकार ताजुउद्दिन महाराज शेख यांचे किर्तन नंदूरबार जवळील जामोद या गावी किर्तनसेवा चालू असताना व मुखात हरिनामाचा गजर चालू असताना छातीत दुखत असल्याने खाली बसले.

थोडया वेळातच त्रास वाढल्याने त्यांनी त्याठिकाणी एका वारकरी संप्रदायातील व्यक्तीच्या मांडीवर झोपून गेले. त्यांनी त्याठिकाणी अखेरचा श्वास घेतला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि नंदुरबार जवळ बाबा ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन चालू असताना चालू कीर्तनामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावेते प्रमाण म्हणत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले.

किर्तन चालू असताना ते खाली बसले आणि तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले. त्या किर्तनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कीर्तन चालू असताना भजन करताना मरण येणे हे साधूत्वाचे फार मोठे लक्षण आहे असे बोलले जाते. किर्तनकार ताजुउद्दिन महाराज शेख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे.

संत ताजुउद्दिन महाराज शेख यांच्यावर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गोंधलापुरी येथे दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.