अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पाच दिवस आधीच पित्याचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मुलीचा पहिलाच वाढदिवस त्यामुळे तो थाटामाटात करण्याचा कोणत्याही पित्याचा प्रयत्न असतो.

मात्र पारनेर तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मुलीचा वाढदिवस असल्याने किराणा सामान आणन्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघात होवून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विनोद पोपट सोबले (वय २७, जामगाव) असे त्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जामगाव घाट येथे राहत असलेल्या घरुन गावात किराणा आणण्यासाठी पाहुण्यांच्या चार चाकी गाडीतून जामगाव येथे जात असताना

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जवळच असलेल्या पानमळा परिसरात रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर गाडी आदळल्याने मोठा अपघात झाला.

ही घटना समजताच परिसरातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्याला तातडीने नगर येथे उपचारासाठी नेले परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, भावजय, पत्नी, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. तो पारनेर पतसंस्थेच्या सुपा शाखेत रोखपाल म्हणून काम करत होता. त्याच्या या अपघाती निधनाने जामगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24