अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे २७ वर्षीय जन्मदात्या बापाने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात एक परप्रांतीय २७ वर्षांचा गृहस्थ आपल्या २५ वर्षीय पत्नी व १० वर्षीय मुलीसह एका पोल्ट्री फार्मवर काम करतात.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पोल्ट्री फार्म च्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सर्व कुटुंब असताना २७ वर्षीय बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
याबाबत मुलीच्या आईने शनिवारी मुलीच्या वडिलांविरुद्ध व स्वतःच्या पतीविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.