संगमनेर तालुक्‍यातील चिंचोली गुरव येथे नातेवाईकाच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमाला गेलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार काल भरदुपारी १.४० च्या सुमारास घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव परिसरात राहणारी एक २९ वर्षाची तरुणी हिला तिच्या भाऊबंद आरोपीने त्याच्या गावातील घरी श्री गणपती निमित्ताने असलेल्या जेवणाच्या कार्यक्रमास बोलावले.

तरुणी कुटुबासह भाऊबंद नातेवाईकाच्या घरी गेली असता ती जेवण वाढण्याचे काम करीत असताना तेथे असलेली आरोपीची पत्नी, जाव हिने पिडीत तरुणीला सांगितले की,

तू स्वच्छता करण्यासाठी झाडू आण तेव्हा झाडू आणण्यासाठी विवाहित तरुणी तिसर्‍या मजल्यावरील खोलीत गेली असता तेथे आरोपी विशाल सोपान शेटे, बय ३६, रा. गघा मळा, चिंचोली गुरव याने तरुणीच्या मागे मागे जावून ती खोलीत झाडू घेत असताना

अचानकपणे खोलीचा दरवाजा लावून तरुणीचे तोंड दाबून धमकी देवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व म्हणाला की, मी तुझ्या घरी रात्री येईल तेव्हा दरवाजा उघडा ठेव, असे म्हणून तू मोबाईलवर होती,

असे सांग अशी धमकी दिली, पिडीत अत्याचारित तरुणीने नातेवाईकांसह थेट संगमनेर पोलिसात जावून फिर्याद दिल्यावरुन आरोपी नातेवाईक विशाल सोपान शेटे याच्याविरुद्ध ‘भादवि कलम ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

आरोपी विशाल शेटेचा ‘पोसई खंडीझोड हे शोध घेत आहेत. नातेवाईकाकडूनच जेवणाच्या कार्यक्रमाला बोलावुन बलात्कार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.