file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर नगर पालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन वर एकाने बोअर घेतल्याने मुख्य रस्त्यावर राहत असलेल्या नागरिकांना तीन दिवस पाणी पुरवठा झाला नाही.

त्यामुळे आरडाओरडा झाला. शहरातील मुख्य रस्त्यावर एक सराफी दुकान आहे. दुकानाच्या समोर पालिकेचा फुटपाथ असून त्या खाली पिण्याची पाईप लाईन टाकलेली आहे.

मागील आठवड्यात दुकान मालकांनी येथे बोअर घेतला.काही वेळातच बोअर मधुन पाणीही आले.पाच फुटांच्या आत पाणी लागल्याचा सर्वांना आनंद झाला.

मात्र बोअर घेणा-यांना लोखंडाचे तुकडे मातीबरोबर बाहेर पडतांना दिसले. या ठिकाणी पाण्याची पाईप लाईन असल्याचे समजले. या ठिकाणी सुरू असलेला बोअर थांबवण्यात आला.