अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नार शहरासह ग्रावापातळीवर कोरोनाचरे संक्रमणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
नुकतेच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गुरूवारी दिवसभरात पुन्हा करोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून
आरोग्य व महसूल प्रशासन मात्र, अद्यापही त्याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. काल दिवसभरात राहुरी शहरात सहाजणांना करोनाची बाधा झाली.
त्यात 4 पुरुष असून ते 65, 54, 33, 67 व 2 महिला 65, 36 वर्ष वयोगटातील आहेत. राहुरी शहरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
तालुक्यात राहुरी शहरासह ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. जिल्हाधिकार्यांचे आदेश पायदळी तुडवून महसूल प्रशासन मात्र, उदासिनता दाखवित असून
तालुक्यात करोना महामारीवर नियंत्रण आणण्यास आरोग्य व महसूल प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.