कोपरगाव पालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव नगरपालिकेत शिस्तप्रिय व उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य केलेले उपमुख्याधिकारी तथा कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आणि अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले यांच्या नुकत्याच विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे प्रभारी सह.आयुक्त संभाजी वाघमारे यांनी हे आदेश काढले आहेत. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांस स्थगिती दिली होती.

त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून बदल्यांना सुरूवात झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या देखील बदल्या होत आहेत.

त्या अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेत उत्कृष्ट सेवा बजावलेले उपमुख्याधिकारी तथा कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी सुनील गोर्डे यांची संगमनेर नगरपालिकेत,

बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांची अमळनेर पालिका आणि अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले यांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बदली झाली आहे. तत्पूर्वी वरील अधिकार्‍यांनी शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या बदल्यांमुळे शहरवासियांत नाराजी पसरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24