Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रहांना आणि राशींना महत्वाचे स्थान आहे, जेव्हा-जेव्हा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. ग्रहांच्या बदलामुळे अनेक शुभ-अशुभ योगही तयार होतात. अशातच सुमारे 100 वर्षांनंतर ग्रहांचा एक अद्भुत संयोग घडत आहे. एकाच वेळी तीन राजयोग तयार होत आहेत.
या नवरात्रीत शाशा राजयोग, भद्रा राजयोग आणि बुधादित्य राजयोग एकाच वेळी तयार होत आहेत. ज्याचा प्रत्येक राशींवर परिणाम दिसून येणार आहे. नवरात्रीला सुरुवात झाली असून, ती २४ ऑक्टोबरला संपणार आहे. दरम्यान, ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगामुळे काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे. या काळात या राशींच्या आयुष्यात यश आणि संपत्तीचे सर्व दरवाजे उघडतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे योग फायदेशीर मानले जात आहेत.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हे संयोजन खूप फायदेशीर मानले जात आहे. या योगामुळे मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता आहे. तसेच, नशीब तुमच्या बाजूने असेल. विद्यार्थ्यांना या काळात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नोकरदार वर्गाच्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल, पदोन्नती आणि उत्पन्न वाढेल.
वृषभ
या राशीच्या लोकांसाठीही तीन राजयोगांचा योग शुभ राहील. व्यवसायात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीचा शोधही पूर्ण होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची आणि मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय किंवा कामाशी संबंधित सहलीला जाऊ शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.