रस्त्यावर पडलेल्या खड्डयात प्रवाशांकडून वृक्षारोपन ..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अलीकडे शहरातील विविध रस्ते व महामार्ग अत्यंत खराब झाले आहेत. मात्र या बाबत कोणी दाखल घेत नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या या खड्डयामुळे अनेक अपघात घडत आहेत.

हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून सरकारला जाग येण्यासाठी या खड्डयात वृक्षारोपन करून सरकारचा निषेध केला आहे. जिल्ह्यातील मिरी ते पांढरीपुल हा रस्ता खूप खराब झाला असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले आहेत.

रस्त्यावरील खड्डे चुकवताना सातत्याने लहान-मोठया वाहनांचे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला असून सतप्त प्रवाशांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.

नुकताच पांगरमलजवळ भरधाव टेम्पोने बहिण भावाला चिरडले व या अपघातांमध्ये दोघांनाही आपला जीव गमवावा लागला असे अनेक अपघात या रस्त्यावर सातत्याने होत आहेत.

तरी तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अजून किती प्रवाशांचा बळी गेल्यावर या रस्त्याची दुरुस्ती करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24