अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- केडगाव जागरूक नागरिक मंच च्या वतीने भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केडगाव शाहूनगर चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे ,
प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असे मत मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी व्यक्त केले.
सर्वांनी मंचच्या हरित केडगाव या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच सर्वांपर्यंत वृक्षारोपणाची जनजागृती करावी असे विचार नगरसेवक अमोल येवले यांनी व्यक्त केले.
मंचच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष बागले यांनी या मोहिमेत सहभागी नागरिकांचे कौतुक केले. महेश घायतडक यांनी इथून पुढे मंचच्या माध्यमातून हरित केडगाव आदर्श केडगाव निर्माण करण्यासाठी तरुणयुवक मंचाच्या सर्व सामाजिक कामात पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रसंगी खजिनदार प्रवीण पाटसकर सदस्य सुनील नांगरे चंद्रकांत शिंदे सर , गणेश पाडळे आकाश घोलप,श्रेयस सुर्वे, योगेश मुळे,वेदांत घोलप,उदय वणवे,ओम व्यवहारे,भैय्या मांडगे,विघ्नेश शेंदुरकर,सनी क्षीरसागर,प्रतीक दारकुंडे,राम जाधव आदि उपस्थित होते.