Trending news : तुम्ही शाळेत असताना शिक्षकांना अनेकवेळा अर्ज केला असेल. या अर्जामध्ये तुम्ही रीतसर सुट्टीसाठी विनवणी केली असेल. मात्र एका विद्यार्थ्यांनी शिक्षकांना केलेला अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्या एप्लिकेशन मध्ये काय होते?
हे अॅप्लिकेशन बुंदेलखंडी भाषेत लिहिलेले होते. त्यांनी लिहिले की, ‘तो मास्साब ऐसो है कि दो दिना से चड़ रओ है जो बुखार उपर से जा नाक बह रई सो अलग. जई के मारे हम सकूल नई आ पाहे सो तमाए पाऊ पर के निवेदन आए कि दो-चार दिना की छुट्टी दे देते, तो बड़ो अछछो रहतो और अघर हम नई आये तो कौन सो तुमाओ सकूल बंद हो जै’ तसेच या अर्जाच्या शेवटी, मुलाने लिहिले की, ‘तुमाओ अग्याकरी शिष्य “कलुआ”.’
आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी या अॅप्लिकेशनचा फोटो आपल्या ट्विटरद्वारे लोकांसोबत शेअर केला आहे. हे ऍप्लिकेशन तुम्हाला फक्त हसवणार नाही तर त्याची मूळ भाषा देखील तुमचे मन जिंकेल.
दरम्यान, ही पोस्ट शेअर करत IAS अधिकारी अर्पित वर्मा IAS यांनी रजेसाठी अर्ज लिहिला! आणि शेवटी हसणारा इमोजी बनवला. आतापर्यंत या पोस्टवर 10 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत आणि 1400 हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहेत.
या पोस्टवर एका यूजरने ‘ओरे मेरे कलुआ तूने कटाई हड्ड कडाई, अब झाई तारीकन से हमॉ छुटिया मंगईये’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘तुम्हाला आता सुट्टी का द्यावी लागली?’